‘या’ Apps द्वारे करता येते Android फोन युझर्सची हेरगिरी !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Android फोन हॅक केल्याच्या आणि त्यातील डेटा लीक झाल्याच्या अनेक बातम्या दररोज येत असतात. अशातच आता Android फोन यूझर्ससाठी आणखी एक अलर्ट समोर आला आहे. वास्तविक गुगल प्ले स्टोअरवर युझर्सची हेरगिरी करू शकणाऱ्या काही ट्रॅकिंग Apps ची माहिती बाहेर आली आहे. या Apps चा वापर आपल्याला घरातील लहान मुले आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी करता येईल.

Four out of 10 mobile phones vulnerable to cyber-attacks, reveals new  report | The Financial Express

सायबर न्यूजकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही टॉप Android Apps युझर्सची आणि त्याच्या/तिच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती हॅकर्स/सायबर गुन्हेगारांना मुलांचा आणि कुटुंबातील सदस्यांना ट्रॅक करण्यासाठी लीक करू शकतात. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे Android Apps गुगल प्ले स्टोअरवर 85 मिलियन (80 लाख) वेळा डाउनलोड केले गेले आहेत. या Apps मध्ये सिक्योर सॉकेट लेयर (SSL) सर्टिफिकेशन योग्यरित्या केलेले नाही, ज्यामुळे ते मॅन-इन-द-मिडल (MITM) हल्ल्यांना असुरक्षित बनवतात.

McAfee: Mobile Malware Attacks Skyrocket During Pandemic

चला तर मग आपल्या फोनसाठी धोकादायक ठरणाऱ्या अशा Apps विषयी जाणून घेऊयात …

My Family locator GPS tracker : यामध्ये एक मॅलिशियस लिंक आढळली. याला मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर 100 पैकी 41 गुण मिळाले आहेत.

​Find my kids: location tracker : यामध्ये एक मॅलिशियस लिंक आढळली. याला मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर 100 पैकी 36 गुण मिळाले आहेत.

​FamiSafe: Parental Control app : यामध्ये दोन मॅलिशियस लिंक्स आढळून आल्या. मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर याला 100 पैकी 30 गुण मिळाले आहेत.

​Phone Tracker by Number : या मध्ये एक मॅलिशियस लिंक आढळली. मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर याला 100 पैकी 23 गुण मिळाले आहेत.

UAE mobile malware attacks saw steady decline as cybercriminals forego  low-hanging fruit - ITP.net

​FamiSafe: Parental Control app : यामध्ये एक मॅलिशियस लिंक सापडली आहे. याला मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर 100 पैकी 23 गुण मिळाले आहेत.

Family GPS tracker KidsControl : मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर याला 100 पैकी 45 गुण देण्यात आले आहेत.

MMGuardian app for Child Phone : मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर याला 100 पैकी 44 गुण देण्यात आले आहेत.

​Pingo by Findmykids : मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर याला 100 पैकी 53 गुण देण्यात आले आहेत.

​Family GPS tracker KidsControl : मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर याला 100 पैकी 47 गुण देण्यात आले आहेत.

​MMGuardian Parent app : मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर याला 100 पैकी 43 गुण मिळाले आहेत.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://play.google.com/

हे पण वाचा :

Maruti कडून भारतात लॉन्च केली जाणार 5 डोअर व्हर्जन एसयूव्ही !!

Credit Card चे पूर्ण लिमिट वापरत असाल तर आताच व्हा सावध… अन्यथा होऊ शकेल नुकसान !!!

Indian Railway : तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!

BSNL च्या ग्राहकांना धक्का ! कंपनीने ‘या’ 3 प्रीपेड प्लॅनमध्ये केला मोठा बदल

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ, नवीन भाव पहा

Leave a Comment