श्रीनिवास पाटलाचं वय झाले, आता नितिन काकांना खासदारकीच तिकीट : वसंतराव मानकुमरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | गेल्या काही दिवसापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी साताऱ्याचे पुढील खासदार म्हणून रणजिंतसिंह नाईक- निंबाळकर यांना संधी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे भाजपाच्या अंतर्गत काही दिवस उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. आता अशीच वेगळी मागणी आता राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केलेली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे पुढील खासदार आता नितिन पाटील यांना करावे, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

बेलोशे येथे एका आयोजित कार्यक्रमात वसंतराव मानकुमरे यांनी मागणी केलेली आहे. वसंतराव मानकुमरे म्हणाले, आमदार मकरंद आबा आहेत, त्याचे काम चांगले आहे. त्यांचे बंधू नितिन काका जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष झाले आहेत. माझी तर इच्छा ते खासदार झाले पाहिजेत. श्रीनिवास पाटील यांच वय झाले आता त्याना काही दिलं नाही तरी चालेल. नितिन काका यांचा दबदबा आहे, पार्टीने विचार केला तर ते खासदार होतील. त्यामुळे नक्कीच साहेब तुम्हाला खासदारकीची तिकिट देतील.

वसंतराव मानकुमरे यांच्या मागणीने आता राष्ट्रवादी पक्षातही खासदार श्रीनिवास पाटील यांच्या ऐवजी पुढील लोकसभेच्या निवडणुकीत बदलाचे वारे पाहिजे अशी मागणी आतापासूनच केली जात आहे. यामुळे लोकसभेची निवडणूक लांब असली तरी चर्चा मात्र आतापासूनच सुरू झालेली पहायला मिळत आहे.