नवी दिल्ली | आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या अपेक्षे प्रमाणे साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकी सोबत लागावी असे त्यांना वाटत होते. मात्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होताना सातारा लोकसभेची पोटनिवडणूक मात्र लागली नाही. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे चाहत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
ही ‘आचार संहिता’ मजी काय असतंय रं लका?
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन देशातील हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली. या घोषणे सोबत देशातील लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा यांच्या रिक्त जागांची पोटनिवडणूक निवडणूक आयोगाच्या मार्फत लावण्यात आली आहे. देशातील विधानसभा आणि लोकसभा मिळून एकूण ६४ जगांची पोटनिवडणूक लावण्यात आली आहे. मात्र उदयनराजेंनी राजीनामा देण्यास उशीर केल्याने त्यांच्या जागेची निवडणूक मात्र लागलीच नाही.
उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील उभा राहणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असतानाच निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याच प्रमाणे उदयनराजे भोसले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर उदयनराजे नेमकी काय भूमिका घेतात हे बघण्यासारखे राहणार आहे.
पुलवामा सारखी घटना घडली नाही तर राज्यात सत्ता बदल निश्चित आहे : शरद पवार
अरुणाचल, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल, कर्नाटक, केरळ , मध्यप्रदेश, मेघालय , ओडिसा ,पॉण्डचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, तेलंगणा, आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभेची पोटनिवडणूक पार पडणार आहे.