महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत दहावी बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. यातही अनेक विद्यार्थ्यांना 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देता येते. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याने काही वर्षे शिक्षण घेतले नसेल, तरी त्याला थेट 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देता येते. आता हा 17 नंबरचा फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता दहावी आणि बारावीच्या खाजगी विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत अतिरिक्त परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांना सर्व शाळा विद्यालय मंडळाच्या अटी शर्तीनुसार नाव नोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहे. शिक्षण मंडळाने सर्व माध्यमिक शाळांना आवाहन केले आहे की, शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या परंतु दहावी उत्तीर्ण असलेल्या मुला मुलींना या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत बसून द्यावी. आणि त्यांना एक नवीन संधी उपलब्ध करून द्यावी.
दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत अति विलंब शुल्क भरून ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे
फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये होणाऱ्या माध्यमिक प्रमाणपत्र दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी फॉर्म नंबर 17 ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे तारखा निश्चित करण्यात आलेले असून 31 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत विद्यार्थी प्रति दिन 20 रुपये अधिनियम शुल्क म्हणून परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. खाजगी विद्यार्थी इयत्ता दहावी आणि बारावीची नाव नोंदणी अर्ज प्रक्रिया विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही. असे मंडळाने देखील सांगितलेले आहे.
अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- शाळा सोडल्याना दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र
- आधारकार्ड
- स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो
- ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत