हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 वी पास असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत 1600 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A अशी विविध पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 8 जून 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission)
एकूण पदसंख्या – 1600 पदे
भरली जाणारी पदे –
1. कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2. डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3. डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
पगार किती –
1. कनिष्ठ विभाग लिपिक – पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये).
2. डेटा एंट्री ऑपरेटर – पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये).
3. डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A”- पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये).
शैक्षणिक पात्रता काय हवी –
1. कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – सदर उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
2. डेटा एंट्री ऑपरेटर – मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित विषयासह विज्ञान शाखेत 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.
वय मर्यादा – 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी –
100 रुपये/- (SSC CHSL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in