दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षणमंत्री गायकवाड यांचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | कोरोना विषाणुने जगभर थैमान घातले अहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्याही आता १८०० च्या वर गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लाॅकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढले आहे. यापार्श्वभुमीवर आता १० वी चा शेवटचा राहिलेला भुगालाचा पेपरही रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आम्ही इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या दुसर्‍या सेमिस्टर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आम्ही दहावीसाठी न सोडविलेली शेवटची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे असे गायकवाड यांनी सांगितले आहे.

दरम्यान, विद्यापिठ परिक्षा आणि इतर शालेय परिक्षांचे नियोजन काय असेल याबाबत शासनाकडून अधिकृतरित्या काहिही सांगण्यात आलेले नाही. लाॅकडाउन उठल्यानंतर राज्यातील शाळा सुरु होणार का याबाबतही अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून लवकरच याबाबत माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.