दहावीच्या निकालाबाबत SSC बोर्डानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । दहावीच्या निकालाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (SSC) एक मोठा निर्णय घेतला आहे. एसएससी बोर्डाकडून मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेतील भूगोल विषयाचा पेपर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द झाला होता. आता या विषयाचे गुण कसे दिले जाणार ते बोर्डाने जाहीर केले आहे.

बोर्डाने या संदर्भात एक परिपत्रक जरी केलं आहे. त्यानुसार, सामाजिक शास्त्रे पेपर- २ या विषयाचे गुणदान हे सरासरीने होणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेत त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी लक्षात घेऊन त्याचे गुणांत रुपांतर करून त्यानुसार गुण दिले जातील.

भूगोल विषयाची परीक्षा २३ मार्च २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नियोजित होती; मात्र ती करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या.

या दोन्ही विषयांचे गुणदान कसे होणार याविषयी बोर्डाने माहिती जाहीर केली आहे. याचसोबत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान विद्यार्थ्यांनी अन्य विषयांच्या लेखी, तोंडी / प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन / तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेऊन त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.

maharashtra times

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment