व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊनचा नियम मोडू नये, म्हणून ‘या’ देशाचे पंतप्रधान आपल्या मरणासन्न आईला भेटू शकले नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट्टे यांनी जगभरातील सर्व नेत्यांसाठी एक उदाहरण ठेवले आहे. ज्याची सध्या सगळीकडे खूप चर्चा होते आहे. पीएम मार्क यांची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती आणि त्या जगणे शक्य नसल्याचे त्यांच्या डॉक्टरांनीही सांगितले होते. मात्र, कोरोनाव्हायरसमुळे देशात लागू असलेल्या लॉकडाउनमुळे मार्क यांना शेवटच्या क्षणीसुद्धा त्यांच्या आईला भेटता आले नाही. लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानंतर मार्क आपल्या आईला भेटायला गेले, मात्र त्याच रात्री त्यांच्या आईचा मृत्यू झाला.

नेदरलँड्स पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मार्क आपल्या आजारी असलेल्या आईला ज्यादिवशी भेटायला गेले त्या रात्रीच त्यांचे निधन झाले. प्रवक्त्याने सांगितले की, त्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या, मात्र पंतप्रधानांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केल्यामुळे ते त्यांना भेटायला जाऊ शकले नाही. मार्कने गेल्या सोमवारी जाहीर केले होते की,’ त्यांच्या ९६ वर्षीय आईचे १३ मे रोजी निधन झाले आहे. मार्क यांनी स्पष्टीकरण दिले होते की ,’त्यांच्या आईचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गाने नव्हे तर दीर्घ आजाराने झाला.’

गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आपल्या आईच्या अखेरच्या दिवसांत आईबरोबर राहता न आल्याबद्दल मार्कला खूप वाईट वाटत आहे. मात्र, त्यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की,’ पंतप्रधान असलो तरीही कायदे प्रत्येकाला तेवढेच लागू आहेत.’ पीएम मार्कची यांची आई केअर होममध्ये राहत होती आणि लॉकडाऊनच्या नियमांनुसार केअर होमला भेट देण्यास पूर्णपणे बंदी घातली गेली होती.

पंतप्रधानांच्या कार्यालयानेही याची पुष्टी केली आहे की, डॉक्टरांकडून मार्क यांना त्यांच्या आईच्या बिघडलेल्या अवस्थेबद्दल माहिती देण्यात आली होती. मात्र कायद्याचे उल्लंघन करणे त्यांना योग्य वाटले नाही. मार्कने आपल्या आईच्या मृत्यूची घोषणा केली आणि म्हटले की,’ मी तिच्याबरोबर शेवटचे क्षण घालवू शकलो नाही याहून अधिक दु: खदायक काहीच नाही.’ नेदरलँड्समध्ये आतापर्यंत ४५,००० पेक्षा जास्त संसर्गाची नोंद झाली आहे, तर त्यातून ५,८०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.