हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा (SSC Result 2023) निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीचा मुलांचा निकाल 92.5% लागला आहे तर मुलींचा निकाल 95.87% लागला आहे.
राज्य मंडळातर्फे घेतलेल्या या परीक्षेसाठी (SSC Result 2023) १५ लाख ४१ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 14 लाख 34 हजार 898 इतके विद्यार्थी पास झाले. यंदा राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.११ टक्के लागला आहे तर सर्वात कमी ९२.०५टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.
कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के
मुंबई 93.66%
कोकण 98. 11%
पुणे 95.64%
नाशिक 92.22%
औरंगाबाद 93.23%
कोल्हापूर 96.73%
अमरावती 93.22%
लातूर 92.66%
नागपूर 92.05%
या संकेतस्थळांवर पहा दहावीचा निकाल
1. www.mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org
3. https://ssc.mahresults.org.in