दहावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी; राज्याचा निकाल 99.95 टक्के

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. राज्याचा निकाल 99.95 टक्के लागला आहे त्यात मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे तर मुलांचा निकाल 99.94 आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी याबाबत आज माहिती दिली.

सन 2020-21 वर्षातील एसएससी (इ. 10 वी ) परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यातील 12 384 शाळांचा निकाल 100% लागला आहे. तर राज्यातील नऊ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

दहावीच्या परिक्षेत कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. शालेय शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी खालीलप्रमाणे सूत्र ठरविले आहे.

1) विद्यार्थ्यांचे इ 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन – 30 गुण

2) विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन – 20 गुण

3) विद्यार्थ्यांचा इ. 9 वी च्या अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in, mahahsscboard.in वर निकाल उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment