सातारा प्रतिनिधी | कोरेगाव ते सातारा मार्गावर रेल्वेस्टेशन उताराला सकाळी नऊच्या सुमारास दहिवडी – सातारा एस टी. चा अपघात झाला. दहिवडीहून सातारच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने कोरेगाव रेल्वे पुलनाजीक ही घटना घडली.
ब्रेक निकामी झाल्याचे समजताच चालकाने नदीत जाणारी एसटी बस झाडाला धडकवून थांबवल्याने २५ प्रवाशांचे प्राण वाचले. भर उताराला झालेल्या अपघातातील एसटी झाडाला धडकल्याने झालेल्या मोठ्या आवाजा मुळे काही अंतरावर अवैदय प्रवासी वाहतूक कारवाइ साठी थांबलेल्या जिल्हा वाहतूक शाखेचे पथकाने घटनास्थळी धावा घेतली. व घटनेची माहिती कोरेगाव पोलिस ठाण्याला कळविली.
घटनेची माहिती मिळताच कोरेगाव वाहतूक शाखेचे महादेव खुडे,रियाज शेख, आदी पोलिस कर्मचारी वर्गा सह नागरिकांनी अपघातात भयभीत झालेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढले. प्रथमदर्शनी अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी बहुसंख्य प्रवाशांना मुका मार बसल्याचे अनेकांनी सांगितले .