ST Bus Strike |महाराष्ट्रात आता वेगवेगळे सण साजरे होणार आहेत. नुकताच गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी नोकरीसाठी आलेले अनेक लोक आणि विद्यार्थी आता गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या गावी परत जात असतात. आणि लांब गावी जाण्यासाठी अनेकजण राज्य परिवहन एसटीचा वापर प्रवासासाठी करत असतात. परंतु आता गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे. त्यांनी बेमुदत संपाची घोषणा केलेली आहे. हे कर्मचारी आजपासून संपूर्ण राज्यभर बेमुदत आंदोलन सुरू करणार आहे. या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Bus Strike) आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला आहे. आर्थिक बाब , खाजगीकरण या गोष्टींची मागणी त्यांनी विधानसभा आचार संहिता लागण्यापूर्वीच मान्य करा. अन्यथा हे आंदोलन बेमुदत चालू राहीना असे सांगितलेले आहे.कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे आता ऐन गणेश उत्सवाच्या काळातच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना (ST Bus Strike) देखील वेतन देण्यात यावे. ही गोष्टी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे.तसेच त्यांच्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करावी. यासाठी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे. मुंबईतील सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शनात देण्यात आलेली आहे. आणि यावेळी त्यांनी सरकारला शेवटचा इशारा देखील दिलेला आहे. राज्य सरकारने या मागण्या तातडीने मान्य करायला अन्यथा 3 सप्टेंबर पासून राज्य आणि राष्ट्रीय कर्मचारी बेमुदत संपाची घोषणा केलेली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळावी तसेच त्यांचा प्रलंबित महागाई भत्ता फरक, घर भाडे, भत्ता वेतन वाढीच्या दराचा फरक. त्याचप्रमाणे 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप करण्यात यावे तसेच मूळ वेतनात जाहीर केलेल्या 5 हजार 4000 आणि अडीच हजार रुपयां ऐवजी 5000 रुपये सरसकट द्यावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत? | ST Bus Strike
- खाजगीकरण बंद करावी ही एसटी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे.
- सुधारित जाचक शिस्त आणि आवेदन कार्यपद्धती बंद करा.
- इंडोर आणि आऊटडोर मेडिकल कॅशलेस योजना चालू करा.
- जुन्या झालेल्या एसटी चालकातून काढून टाका आणि स्व मालिकेच्या नवीन बस खरेदी करा.
- वाहक चालक व महिला कर्मचाऱ्यांना सर्व सुख सोयीचे विश्रांती गृह द्या.
- वेळापत्रकातील त्रुटी दूर करा.
- सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती पेन्शन मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा.
एसटी कर्मचाऱ्यांनी या सगळ्या मागण्या केलेल्या आहेत. आणि या मागण्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर व्हाव्यात असे आव्हान देखील केलेले आहे. जर या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही, तर ३ सप्टेंबरपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा देखील देण्यात आलेला आहे.