तळा : हॅलो महाराष्ट्र – रोवळा-वाशी एसटी बसमधील कंडक्टर आणि ड्रायव्हर हे आपली ड्युटी करत असताना बोरभाट बस स्टॉपजवळ काही नागरिकांनी त्यांना जबर मारहाण (st driver and conductor were beaten) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बस ड्रायव्हर सचिन जंगम व कंडक्टर सुनिल शेडगे आपली तळा – वाशी गाडी घेऊन जात असताना तळे येथे 2 उन्मत्त आणि मद्यपी प्रवाशांनी गाडीला हात करून थांबण्याचा इशारा केला. मात्र बस चालकाने जागेअभावी गाडी पुढे नेऊन थांबवली व पुढे येण्याची विनंती केली. मात्र गाडी पुढे नेऊन थांबवल्यामुळे दोघांपैकी एकाने दरवाज्यात उभ्या असलेल्या वाहकाला कॉलर धरून मारहाण (st driver and conductor were beaten) केली व त्या ठिकाणाहून निघून गेला.
यानंतर काही वेळाने हि बस माघारी येत असताना मारहाण करणाऱ्या व्यक्तीने आदीवासी वाडीतील जमाव एकत्र करून रस्त्यावर मोटार सायकली आडव्या घालत एसटीचा रस्ता अडवला. यानंतर जमावाने गाडीत जाऊन चालक व वाहक यांना जबर मारहाण (st driver and conductor were beaten) केली. या ग्रामस्थांनी एसटी कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवगाळ करत मारहाण (st driver and conductor were beaten) केली आहे. वाहक सुनील शेडगे यांनी याबाबत तळा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार ड्रायव्हर सचिन जंगम व कंडक्टर सुनिल शेडगे हे तळा-वाशी गाडी घेऊन जात होते. तळा येथे दोन प्रवाशांनी रस्त्यात हात दाखवला असता जागेअभावी पुढे येण्याची विनंती वाहक शेडगे यांनी केली. त्यानंतर शहरातील कॉर्नरवर गाडी उभी करून त्यांनी बसमध्ये प्रवाश्यांना घेतले. त्यापैकी एक आरोपी गाडीत बसला, तर दुसरा आरोपी हा मद्यपान केलेला होता, तो खालीच होता. त्यानंतर त्यांनी दरवाजात कंडक्टरला मारहाण (st driver and conductor were beaten) केली. त्यानंतर या व्यक्तींनी आदीवासी वाडीतील काही गावकऱ्यांना फोन करून जमवले. रस्त्यावर मोटार सायकली आडव्या घालून रस्ता रोखून धरला. बस आल्यानंतर गाडीत शिरून त्यांनी कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना लाथाबुक्यांनी मारहाण (st driver and conductor were beaten) व शिवगाळ केली. या प्रकरणी वाहक सुनील शेडगे यांनी याबाबत तळा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!