कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरुच आहे. सरकारचे लक्ष वेधून घेत आज कराड येथील आगारा समोर अनेक कर्मचार्यांनी स्वताःचे मुंडन करुन शासनाचा निषेध व्यक्त करुन ढफ, टाळ मृदूंगाच्या वाद्यात घोषणाबाजी केली. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे न घेण्यावर कर्मचारी ठाम आहेत. राज्य शासनाकडून संप मागे घेण्याबाबत वारंवार आवाहन करण्यात येत असतानाही कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू आहे.
दरम्यान या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. राज्यभरात सुरू असलेलं एसटी कामगारांचं आंदोलन चिघळलं असून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही ते आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येत आहे.
आज येथील आंदोलनात काही तृतीयपंथी ही सहभागी झाले होते. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपला पांठिबा देत आंदोलनात सहभागी होत घोषणाबाजी केली. आज ही नोकरदार, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना संपाचा फटका बसला. मात्र खाजगी वाहतूकदारांनी याचा पूरेपूर फायदा उचलत वाहतूक सूरू ठेवली आहे. तर महामार्गावर कार, ट्रक, टेम्पो तसेच मिळेल त्या वाहनांने प्रवाशी प्रवास करताना दिसत आहेत. उद्या शूक्रवारी कराड येथे विविध संघटनांच्या सहभागाने एसटी कर्मचारी कचेरीवर मोर्चा काढून निवेदन देणार आहेत