हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बसमधील कंडक्टरला कन्नड येत नाही म्हणून मारहाण केली असून , त्याला अन बसला काळ फासल्याची चर्चा सगळेकडे जोरदार सुरु आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यासाठीच महाराष्ट्र एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच ठाकरेंच्या सेनेकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हे वातावरण अजून चिघळण्याची शक्यता आहे.
एसटी वाहतूक तात्पुरती थांबवली जाणार –
कर्नाटकमध्ये कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला केला आहे . या घटनेनंतर महाराष्ट्र एसटी महामंडळाने तात्काळ निर्णय घेतला आहे . या निर्णयात महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवली जाणार असल्याचे सांगितले आहे. या मारहाणीच्या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाकडून कर्नाटकाच्या बसला अडवून आक्रमक आंदोलन करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद वाढण्याची शक्यता –
पुणे-बंगळुरु महामार्गावर, चित्रदुर्ग जिल्ह्यात हि घटना घडली आहे. कन्नड कार्यकर्त्यांनी एसटी बसच्या चालकाला कन्नड येते का ? असा प्रश्न विचारला पण त्याला कन्नड येत नसल्यामुळे कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कंडक्टर आणि बसवर हल्ला केला आहे. लोकांनी त्याच्या तोंडाला काळे फासून बसला देखील काळे फासले आहे. या घटनेमुळे सर्व महाराष्ट्रात संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे अजून एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकांचे हिंसक वर्तन –
कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी असं हिंसक वर्तन दाखवले आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा सीमा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी सुद्धा कन्नड कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले आहेत. तेव्हाही महाराष्ट्र अन कर्नाटक तणाव वाढला होता.