हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे चाहते काही कमी नाहीत. सचिनला क्रिकेटचा देव असेही म्हंटल जात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 100 शतके मारणार सचिन जगातील एकमेव खेळाडू आहे. फक्त सामान्य माणूसच नव्हे तर राजकारणात आणि काळविश्वात देखील सचिनचे चाहते आहेत. यापूर्वी भोजपुरी अभिनेता आणि खासदार मनोज तिवारी यांनी आपल्या गावात घराजवळ सचिन तेंडुलकरची मुर्ती बनवली होती.
आता सचिनच्या नावाने एक स्टेडियम तयार करण्याची मनोज तिवारीची इच्छा आहे. मनोज तिवारी यांनी आपल्या गावात अतरवालिया येथे एक मोठे स्टेडियम उभारण्यासंबधी वक्तव्य केले आहे. हे स्टेडियम सचिनच्या नावावर असेल. दिल्लीचे भाजपा खासदार मनोज तिवारी आपल्या वैयक्तिक कामातून कैमूरला आले होते तेव्हा त्यांनी याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले की, माझे स्वत:चे गाव अतरवालिया येथे स्टेडियम असण्याचे माझे स्वप्न आहे. जेणेकरून येथे राष्ट्रीय सामना खेळला जाऊ शकेल आणि खेड्यातील तरूणांना संधी मिळेल.”आम्ही स्टेडियमच्या मैदानासाठी जमिन शोधत आहोत. पण सापडत नाहीये. येथे, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर खूप प्रेम आहे. आम्हाला कोणालाही जमीन देण्यासाठी भाग पाडण्याची इच्छा नाही. पण, आम्ही शेतकऱ्यांशी यासंबंधी बोलत आहोत. मी वचन देतो की, पुढील वर्षात हे स्वप्न प्रत्यक्षात येईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’