लाचखोर मुद्रांक विक्रेता अटकेत, शेगाव येथे एसीबीची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा प्रतिनिधी । दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेता म्हणून काम करणाऱ्या एका इसमान दस्त नोंदणीसाठी दुय्य्म निबंधकाच्या नावान एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. हे करत असताना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागान त्याला रंगेहाथ पकडलं. ही कारवाई बुधवारी सायंकाळी शेगाव इथं करण्यात आली. या कारवाईन दुय्य्म निबंधक कार्यालयाचे धाबे दणाणले आहे.

सुधीर बावसकर या लाचखोर मुद्रांक विक्रेत्याला दुय्यम निबंधक कार्यालय आवारात पोलिसांनी रंगेहात पकडले. उन्हाळे नावाच्या एका तक्रारदार व्यक्तीकडून बावसकर हा लाच घेत होता. ही माहिती या व्यक्तीने पोलिसांना दिली. या माहितीवरून पोलिसांनी त्याच्याकडं लक्ष ठेवल. आणि त्याला लाच स्विकारताना रंगेहात पकडलं.

हक्कसोडपत्र नोंदविनेसाठी दुय्यम निबंधक यांना देणेसाठी उन्हाळे यांच्याकडून पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंचासमक्ष १ हजार रुपये लाच स्विकारल्यान आरोपी सुधीर बावसकर यांना ताब्यात घेण्यात आल. तसच या मुद्रांक विक्रेत्या विरुद्ध शेगाव शहर पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

इतर काही बातम्या-

 

Leave a Comment