हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी असलेल्या LIC चे देशभरात अनेक ग्राहक आहेत. देशातील जवळपास सर्वच स्तरातील लोकांकडून एलआयसीच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली जाते. आज आपण LIC च्या बीमा रत्न पॉलिसीबाबत जाणून घेणार आहोत. यामध्ये 5 लाख रुपये गुंतवून मॅच्युरिटीवर 50 लाखांपर्यंतची रक्कम मिळवता येईल. यामध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदाराला त्यांच्या सुरुवातीच्या डिपॉझिट्सच्या 10 पट रक्कम मिळवता येईल.
हा एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, इंडिव्हिज्युअल, सेव्हिंग लाइफ इन्शुरन्स प्लॅन आहे. वास्तविक, हा एक गॅरेंटेड बोनस देणारा मनी बॅक प्लॅन आहे. यामध्ये मॅच्युरिटीवर गॅरेंटेड बोनस दिला जाईल. या पॉलिसीची खास बाब अशी कि, यामध्ये फक्त थोड्या कालावधीसाठीच प्रीमियम भरावा लागेल. त्यानंतर गॅरेंटेड बोनस दिला जाईल.
कमीत कमी 5 लाख रुपयांचा विमा काढावा लागेल
LIC च्या या पॉलिसीमध्ये कमीत कमी 5 लाख रुपयांचा विमा काढावा लागेल. यामध्ये कमीत कमी 90 दिवस तर जास्तीत जास्त 55 वर्षे वयाच्या नागरिकांना गुंतवणूक करता येईल. तसेच यामध्ये गुंतवणूकदाराला त्याच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरता येईल.
पॉलिसीचा कालावधी किती असेल ???
ही पॉलिसी 15 वर्षे, 20 वर्षे आणि 25 वर्षांच्या टर्ममध्ये उपलब्ध असेल. म्हणजेच आपल्याला या तीनपैकी कोणत्याही एका मॅच्युरिटीचा कालावधीची निवड करता येईल. यामध्ये पॉलिसीच्या मुदतीनुसार वेगवेगळ्या वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. यामध्ये 15 वर्षांच्या मुदतीत फक्त 11 वर्ष, 20 वर्षांच्या मुदतीत 16 वर्षांसाठी आणि 25 वर्षांच्या मुदतीत 21 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.
LIC Bima Ratna Policy ची वैशिष्ट्ये
>> यामध्ये वयाच्या 90 दिवसांपासून ते 55 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते.
>> यामध्ये किमान 15 वर्षांसाठी किमान 5 लाखांची विमा रक्कम घ्यावी लागेल.
>> 15 वर्षांसाठी 5 लाखांची विमा रक्कम घेतल्यास जवळपास 9,00,000 रुपये मिळवू शकता.
>> यामध्ये किमान मासिक 5 हजार रुपये प्रीमियम भरावा लागेल. त्यानुसार दररोज सुमारे 166 रुपयांची बचत करावी लागणार आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/LIC-s-Bima-Ratna-(Plan-No-864,-UIN-No-512N345V01)
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत संमिश्र कल, तपासा आजचे नवे भाव
आपल्या Pan Card चा गैरवापर तर झाला नाही ना ??? घरबसल्या अशा प्रकारे तपासा
Charger : आपला फोन वारंवार चार्ज करण्याने त्याच्या बॅटरीवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या
3 स्टार-5 स्टार AC मध्ये काय फरक आहे??? यापैकी कोणता खरेदी करणे फायदेशीर ठरेल ते पहा
FD Rates : ‘या’ 6 बँकांच्या FD मध्ये पैसे जमा करून मिळवा दुप्पट नफा