Wednesday, March 29, 2023

नवी मुंबईत नेरुळ – उरण रेल्वे मार्गावर ट्रेनचा अपघात; 3 डबे रुळावरून घसरले

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी मुंबईत आज सकाळी नेरुळ ते उरण जाणारी लोकल अचानक रुळांवरून घसरल्याची घटना घडली आहे. हार्बर मार्गावरील नेरुळ – उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेला अपघात झाला. या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हार्बर मार्गावरील नेरुळ – उरण रेल्वे मार्गावरून लोकल ट्रेन जात होती. ट्रेन जात असताना ट्रेनचे तब्बल तीन डब्बे अचानक घसरले. त्यामुळे ट्रेनमधील प्रवाशंहे काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले. ट्रेनचे डबे रुळावरून खाली घसरल्याने बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

- Advertisement -

ऐन गर्दीच्या वेळी अपघाताची ही घटना घडल्यामुळे नेहमीच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला. या अपघातानंतर रेल्वे आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले तात्काळ दाखल झाले. रुळावरून घसरलेले तीन डबे पुन्हा एकदा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. या रेल्वे अपघातामुळे बेलापूर-खारकोपर-नेरुळ मार्गावरील लोकल ट्रेन थांबवण्यात आलेल्या आहेत.