औरंगाबाद :औरंगाबाद विमानतळावर औरंगाबाद ते दिल्ली, मुंबई यासह पर्यटन दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या गोवा जयपूर जोधपूरला थेट विमानसेवा उपलब्ध करून देण्याची मागणी खा.डॉ.भागवत कराड यांनी एअर इंडियाचे सी. एम. डी. राजीव बन्सल यांच्याकडे केली.
सध्या आठवड्यात केवळ दोन दिवस एअर इंडियाची विमाने येतात तर इतर विमान कंपन्यांची विमाने औरंगाबाद ते दिल्ली, औरंगाबाद ते मुंबई साठी फुल असतात. त्यामुळे एअर इंडियाने दिल्ली आणि मुंबई शहरासाठी विमानसेवा आणि फेऱ्या वाढवाव्यात त्याचबरोबर नागपूर, पुणे, गोवा, जयपूर, जोधपूर या शहरात देखील विमान सेवेचा विस्तार करण्याची मागणी डॉ. कराड यांनी केली.
औरंगाबाद विमानतळाला 2015 पासून कस्टमर एअरपोर्टचा दर्जा देण्यात आलेला होता. आता विमानतळावर स्वतंत्र टर्मिनल प्रशस्त इमारत आणि इतर पायाभूत सुविधा लक्षात घेता खा.डॉ.भागवत कराड यांनी औरंगाबादेत विमान सुविधा वाढविण्याबाबत राज्यसभेत प्रश्न विचारला, त्यावेळी नागरी उड्डयन मंत्री (हवाई वाहतूक) हरदीपसिंग पुरी यांनी औरंगाबादेत विमानसेवा सुरू करणे आणि अन्य शहराशी विस्तार करण्याबाबत आश्वासन दिले. शहरालगत पाच औद्योगिक वसाहती आहेत. तसेच जागतिक स्तरावर पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने विमान सेवेचा विस्तार होणे आवश्यक असल्याची मागणी डॉ. भागवत कराड यांनी केली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group