माढा मतदारसंघातील फलटणला सैनिक स्कूल सुरू करा : खा. रणजिंतसिंह निंबाळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | माढा मतदार संघातील फलटणला सैनिक स्कूल सुरू करण्याची मागणी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केली आहे. यावेळी माण- खटावचे आ. जयकुमार गोरे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, दौंडचे आ. राहुल कुल, आ. समाधान आवताडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकारने देशात नवीन 100 सैनिक स्कूल सुरू करण्याचे नियोजन केले असून, माढा मतदारसंघात 25 लाख लोकसंख्या असून, सातारा व सोलापूर या दोन्ही जिल्ह्यात हा मतदासंघ विभागला आहे. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

येथील युवक देशप्रेमाने प्रेरित असून, हजारोच्या संख्येने लोक देशसेवेत सामील आहेत, त्यामुळे येथील युवक सैन्य भरतीसाठी कायमच अग्रेसर असतो. अशा युवकांना योग्य प्रशिक्षण व शिक्षण मिळण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यात सैनिक स्कूल व्हावे, अशी मागणी माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केंद्रीय सरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे.

Leave a Comment