SBI खातेदारांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेला ऑनलाइन बँकिंग सेवा बंद राहण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेची (SBI) ऑनलाइन सेवा 21 जून रोजी बंद राहण्याची शक्यता आहे. एसबीआयने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

”काही अ‍ॅप्लिकेशन्सवर काम सुरू असल्यामुळे रविवारी 21 जून रोजी ऑनलाइन सेवेचा वापर करताना ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन सेवेशी निगडित कामं आधीच करुन घ्यावीत”, अशा आशयाचं ट्विट करत एसबीआयने याबाबत माहिती दिली आहे.

यापूर्वी 13 आणि 14 जून या दोन दिवशीही SBI च्या ऑनलाइन बँकिंग सेवेमध्ये ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागला होता. पेटीएम, UPI, YONO SBI अ‍ॅप, SBI इंटरनेट बँकिंगद्वारे व्यवहार आणि अकाउंट बॅलेंस चेक करताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी ट्विटरद्वारे केल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”