हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील सामान्य नागरिकांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईच्या महत्त्वाच्या भागांच्या पुनर्विकासासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या हृदयस्थानी घर घेणाऱ्यांसाठी मोठा संधी उपलब्ध होणार आहे. तसेच या निर्णयामुळे लोकांना त्यांच्या स्वप्नातील घर घेणे शक्य होणार आहे. तर चला म्हाडा (MHADA) अंतर्गत इमारतींच्या पुनर्विकासाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
पुनर्विकासाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता –
मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशन अन वरळीतील आदर्शनगर येथील म्हाडा (MHADA) अंतर्गत इमारतींच्या पुनर्विकासाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना मोठ्या आणि अधिक सुविधायुक्त घरांची संधी मिळणार आहे. वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळी येथील घरांवर 800 ते 2500 चौरस फुटांची जागा उपलब्ध होईल.
नव्या घरांचा आकार आणि संधी –
वरळीच्या आदर्श नगरच्या रहिवाशांना 800 ते 2500 चौरस फुटांची घरं मिळणार आहेत , तर वांद्रे रिक्लेमेशनच्या रहिवाशांना 1000 ते 1200 चौरस फुटांची घरं मिळणार आहेत. यामुळे येथील स्थानिक नागरिकांना त्यांच्या घराच्या आकारात वाढ होईल. पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून म्हाडाला जवळपास 1 लाख 14 हजार 822 चौरस मीटर जागा मिळणार आहे, जिथे हजारो घरांची उभारणी केली जाईल. हे घरं म्हाडाच्या सोडतीच्या माध्यमातून इच्छुक नागरिकांना उपलब्ध होतील.
पुनर्विकास प्रक्रियेचा अंतिम उद्देश –
या पुनर्विकास प्रक्रियेतील जागा वांद्रे रिक्लेमेशनमध्ये 197466 चौरस मीटर अन वरळी आदर्श नगरमध्ये 68034 चौरस मीटर इतकी उपलब्ध होईल. त्यामुळे स्थानिक नागरिकांसोबतच शहरातील इतर इच्छुक नागरिकांसाठी हे घर एक मोठी संधी ठरेल. पूर्वी वांद्रे, वरळी अन काळाचौकी येथील अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाला मंजुरी मिळाली होती. आता वांद्रे आणि वरळीतील या महत्त्वपूर्ण वसाहतींमधील पुनर्विकासाला मंजुरी मिळाल्यामुळे मुंबईतील या क्षेत्रातील कायापालट होईल. पुनर्विकास प्रक्रियेचा अंतिम उद्देश स्थानिक नागरिकांना अधिक क्षेत्रफळातील घरं उपलब्ध करून देणं आहे. तसेच, यामुळे मुंबईत घर खरेदीसाठी किमती कमी होण्याची शक्यता आहे.