दीपक केसरकरांनी घेतला मोठा निर्णय ! जिल्हा शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये लागू होणार CBSE पॅटर्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आजकाल जर आपण पाहिले तर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आजकाल प्रवेश खूप कमी येतात. आजकाल पालकांचा जास्त ओढा हा सीबीएससी बोर्डाच्या शाळांकडे आहे. आपल्या मुलांना सीबीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये टाकावे आणि चांगले शिक्षण द्यावे. यासाठी लोक सीबीएससी बोर्डांमध्ये त्यांच्या मुलांना टाकतात. परंतु आता राज्या राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये देखील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, स्पर्धा परीक्षांमध्ये मुले मागे पडू नये. यासाठी राज्य शिक्षण मंडळाचे शाळांमध्ये सीबीएससी अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत अभ्यासक्रम देखील निश्चित करण्यात आलेला आहे. आणि पुढील वर्षापासून राज्यशिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये हा सीबीएससी पॅटर्नचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. याबद्दलची माहिती दीपक केसरकर यांनी दिलेली.

त्याचप्रमाणे सीबीएससी पॅटर्न असला तरी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषयाचा अनिवार्य करण्यात येणार आहे, असे देखील सांगण्यात आलेले आहेत. या आधी अकरावी बारावीला मराठी या विषयाला पर्यायी दुसरा विषय घेता येत होता. परंतु आता सगळ्यांना अकरावी आणि बारावीला मराठी हा विषय शिकणे खूप गरजेचे आहे. नुकतेच झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवण्याबद्दल एक आराखडा तयार केलेला आहे. सीबीएससी शाळांचे वेळापत्रक आणि सुट्ट्या वेगळ्या असतात. त्यामुळे आता त्या शाळाप्रमाणे बदल करण्यासाठी शिक्षक संघटनांची देखील चर्चा करणार आहेत.

त्याचप्रमाणे आता राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी एक मोठी जबाबदारी असणार आहे. त्यांना एक दोन मुलांना शिकवण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. सध्या राज्यात एकूण 48 हजार अंगणवाडी आहेत. आणि आता त्या अंगणवाडी सेविकांना शालेय शिक्षण विभागाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या पुस्तकांची छपाई देखील केली जाणार आहे.

तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मरीन लाईन्स येथे मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषा भवन देखील उभारले जाणार आहे. यासाठी कंत्राटदार मिळाला असून, आता इमारतीचे पूजन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करणार असल्याचे सरकारने सांगितलेले आहे. या साहित्यभावनामध्ये साहित्यकरांना राहण्याच्या व्यवस्थेसोबतच ग्रंथालय साहित्य झाले आणि इत्यादी गोष्टी मिळतील.

त्याचप्रमाणे आता राज्यात इथून पुढे व्यवसायिक शिक्षण देखील बंधनकारक असणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना एक परदेशी भाषा देखील शिकवली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता जास्त ज्ञान मिळणार आहे. व्यावसायिक शिक्षणासोबत परदेशी भाषेचे शिक्षण देखील दिले जाणार आहे. जर कोणत्याही विद्यार्थ्याला पुढे उच्च शिक्षण परदेशात घ्यायचे असेल किंवा नोकरीसाठी जायचे असेल तर त्यांना याचा खूप फायदा होणार आहे.