हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. दिवाळीनिमित्ताने राज्य सरकार कडून शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार कडून याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
4 ऑक्टोबर पासून राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु दिवाळी सणांच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच या कालावधीत ऑनलाइन तसेच ऑफलाईन पध्दतीचे सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज हे बंद राहील असे सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ दरम्यान दिवाळी सणाची सुट्टी असेल.या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन अध्यापनही बंद राहील. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/KaAMvHDadk
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 27, 2021
दरम्यान, गेल्या 2 वर्षांपासून कोरोना मुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरू झाल्या होत्या. राज्य सरकारने काही अटी आणि नियम करत राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.