हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकार हे सध्या सामान्य नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी या योजना आणल्या जात आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना या योजनेची घोषणा केली. आता त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकार एक आनंदाची बातमी घेऊन आलेले आहेत. ती म्हणजे राज्य सरकारचा आनंदाचा शिधा संपूर्ण राज्यातील जनतेला मिळणार आहे. गणेश उत्सवानिमित्त राज्यातील जवळपास 1 कोटी 70 लाख कुटुंबांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. राज्यात 7 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश उत्सवात सगळ्या नागरिकांना आनंदाचा शिधा मिळावा यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे.
सरकार देत असणाऱ्या आनंदाच्या शिधामध्ये नागरिकांना 100 रुपयात प्रत्येकी एक किलो रवा साखर चणाडाळ आणि खाद्यतेल पोहोचवण्यात येणार आहे. टेंडर प्रक्रियेतील बऱ्याचशा अटी आणि शर्ती देखील शिथिल केलेल्या आहेत. त्यामुळे जवळपास 9 कंपन्या टेंडर प्रक्रिया सहभागी झालेले आहेत. त्यामुळे आता हे आनंदाचा शिधा वाटपाचे काम देखील वेगावर आलेले आहे.
याआधी नागरिकांकडून आनंदाचा शिधा अगदी निकृष्ट दर्जाचा येत होता. त्याचप्रमाणे लोकांपर्यंत हा आनंदाचा शिधा पोहोचण्यासाठी उशीर देखील होत होता. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर असा काही प्रकार घडू नये, यासाठी सरकार देखील पुरेपूर काळजी घेत आहे. त्यामुळे आता या गणेशोत्सवाला राज्यातील जवळपास 1 कोटी 70 लाख कुटुंबांना आनंदाच्या शिद्याचा लाभ मिळणार आहे.