सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महाराष्ट्र राज्यात लाॅकडाऊन लागणार असून जिल्हा बंदीही करण्यात येईल असे बोलले जात आहे. लाॅकडाऊन काळात जिल्हा बंदीचा आदेश आल्यास राज्यातील गृहखाते सक्षम असून काटेकोर अंमलबजावणी करेल अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
राज्यात सध्या कडक टाळेबंदी आहे. मात्र जिल्हा बंदीच्या बाबतीत राज्य सरकारने काही नियमावली अजून आलेली नाही. राज्यातील पोलिस प्रशासन जिल्हाबंदी करण्याचा आदेश आल्यास त्यास तयार असल्याचे गृहराज्यमंत्र्याकडून सांगण्यात आले.
गेल्या लाॅकडाऊनमध्ये अगोदरही योग्य पध्दतीने जिल्हा बंदीची अंमलबजावणी पोलीसांनी केली होती. पोलिस दलाच्या कामामुळे कोरोनाला नियंत्रणात आणण्यास मदत झाली होती. आताच्या परिस्थितीतही पोलिस प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनीही शासनाला व प्रशासनाला सहकार्य करावे असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा