नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे रमले शेतात; भर पावसात केली भात लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्यात सध्या ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे पिकांसाठी तो लाभदायक ठरत आहे. साताऱ्याच्या पश्चिमेकडे सध्या भात लावण्याची लगबग सुरू आहे. या परिसरातील डोंगर पायथा लागत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमुख पीक भात असून पावसाने दडी मारल्याने परिसरातील भात लागण रखडली होती. मात्र, सध्या चांगल्या प्रकारे पाऊस पडू लागल्यामुळे शेतकऱयांकडून भातलागणीला सुरुवात करण्यात आले आहे. राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीहि आपले सातारा जिल्ह्यातील जन्मगाव असलेल्या दरे तर्फ तंब येथे भात लागण केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तंब येथे जन्म झाला आहे. ते आपल्या मातीशी आजही जोडून आहेत. एकनाथ शिंदे हे बऱ्याच वेळा जन्मगावी दरे तर्फ तांब या ठिकाणी येत असतात. गावात असणाऱ्या शेतीकडे त्यांचा जास्त कल आहे. सध्या पावसाळी पिकांच्या पेरण्या सुरु आहेत. त्यामुळे शेतात भटलागणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे त्यांनीही आपल्या शेतातील कामात हातभार लाट पारंपरिक पद्धतीने हातात भाताचे तराव घेऊन रोपण केले.

उन्हाळ्यात देखील मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शिंदे यांना शेतीची चांगलीच आवड असल्याचे भाताचे तराव लावतानाचे त्यांचे फोटो पाहिल्यावर पुन्हा एकदा दिसत आहे. राजकारणातून वेळ काढत ते आपली शेती करण्याची आवड आजही जपताना दिसतात. वेळ मिळेल तसे वारंवार आपल्या जन्मगावी येऊन ते आपल्या शेतीकडे विशेष लक्ष देतात.