ड्युटी बजावत असताना स्टेशन मास्तरचे ह्रदयविकाराने निधन; दिड तास रेल्वे वाहतूक ठप्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – परळी- हैद्राबाद रेल्वे मार्गावरील घाटनांदूर रेल्वेस्थानकावरील रात्रीचे ड्युटी बजावीत असताना स्टेशन मास्तरचे आज पहाटे अडीच ते साडे तीनच्या दरम्यान ह्रदयविकाराने निधन झाले. यामुळे यामार्गावरील दिड तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

परळी- हैद्राबाद रेल्वे मार्गावरील घाटनांदूर रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेले रेल्वे स्टेशन मास्तर मुसाफिर सिंह (44) हे रविवारी दिवसा बारा तासाची ड्युटी करून दुसरे स्टेशन मास्तर प्रशिक्षणासाठी गेले असल्याने रात्रीची ड्युटी बजावत असताना आज पहाटे अडीच ते पावणे चारच्या दरम्यान हृदयविकाराने निधन झाले. दरम्यान पानगाव (ता.रेणापूर) येथे कार्यरत असलेले रेल्वे स्टेशन मास्तर नितीन संभारे यांनी पनवेल-परळी रेल्वेला लाईन मिळविण्याससाठी मुसाफिर सिंह यांच्याशी पहाटे पावणे चारच्या दरम्यान दूरध्वनीद्वारे संपर्क साधत असताना दूरध्वनी उचलत नसल्याने त्यांनी रेल्वे गेटमन विजय मीना यांना रेल्वे स्टेशनवर जाऊन फोन का उचलत नाहीत हे पाहण्यासाठी सांगितले. दरम्यान विजय मीना यांनी रेल्वे स्टेशनवर जाऊन पाहिले तर घाटनांदूर स्टेशन मास्तर त्यांच्या खुर्चीवर मृत अवस्थेत पडलेले दिसले मीना यांनी तात्काळ पानगावच्या स्टेशन मास्तर सांबरे यांनी माहिती दिली. सांबरे यांनी सदरील घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्याना माहिती दिली.

दरम्यान लाईन मिळत नसल्याने पनवेल ते परळी ही रेल्वे पानगाव रेल्वे स्थानकात तर काकींनाडा-शिर्डी एक्स्प्रेस परळी रेल्वे स्थानकात दीड तास थांबविण्यात आली. पानगाव रेल्वेस्थानकाचे स्टेशन मास्तर नितीन सांबरे यांनी घाटनांदूर पहाटे साडे पाचला येऊन रेल्वे लाईन देऊन रेल्वे वाहतूक सुरू केली.