हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Steamed Amla Benefits) बिघडती जीवनशैली आणि चुकीच्या सवयी यामुळे मानवी आरोग्य खराब होत आहे. गेल्या काही काळात हृदय विकार, श्वसन संबंधित समस्या आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मधुमेह हा आजार तर जागतिक पातळीवरील संकट होण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना दिसतोय. मधुमेहींना आपल्या आरोग्याबाबत कायम सतर्क राहावे लागते. आपल्या खाण्यापिण्यात येणारा पदार्थ आपल्या आरोग्यासाठी किती चांगला किती वाईट याची त्यांना काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्यांच्या आरोग्यावर लगेच परिणाम होतो.
मधुमेहात टाईप १ आणि टाईप २ असे प्रकार असतात. हे दोन्ही प्रकार हळूहळू माणसाला आतून कमजोर बनवतात. त्यामुळे मधुमेहींनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे तज्ञमंडळी सांगतात. (Steamed Amla Benefits) अशा मधुमेहींच्या आरोग्यासाठी आवळा हा अत्यंत गुणकारी ठरू शकतो. कारण, त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते. अशा औषधी आवळ्याचे सेवन विविध प्रकारे केले जाऊ शकते. कच्चा आवळा खाणे, लोणचे, रस, कँडी किंवा चटणी बनवूनसुद्धा आवळा खाता येतो. आज आपण आवळ्याच्या औषधी गुणधर्मांविषयी जाणून घेऊया. त्यासोबत आवळा इतर कोणकोणत्या समस्येंवर प्रभावीपणे काम करतो त्याबाबतही माहिती घेऊ.
वाफवलेले आवळा खाणे ठरेल आरोग्यदायी
आवळा हा व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, लोह यांचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे आवळा कसाही खाल्ला तरी आरोग्यवर्धक ठरतो. मात्र तज्ञ सांगतात की, आवळा वाफवून खाल्ल्याने शरीरात निरोगी बदल होऊ शकतात. (Steamed Amla Benefits) याबाबत न्युट्रिशनिस्ट सांगतात की, ‘कच्चा आवळा वाफवल्यानंतर त्याची चव आणखी चांगली लागते. तसेच रोज एक वाफवलेला आवळा खाल्ल्याने आपल्या शरीरात निरोगी बदल होऊ शकतात.
कारण, आवळा वाफवल्यानंतर देखील त्यातील व्हिटॅमिन सी टिकून राहते. हे एक प्रभावी अँटि ऑक्सिडंट आहे. जे इम्युनिटी सुधारण्यासाठी आणि शरीराचे संसर्गांपासून संरक्षण करण्यासाठी मदत करते. (Steamed Amla Benefits) शिवाय त्वचेचे आरोग्य, केसांचा पोत सुधारण्यास देखील मदत करते’. खास करून असा आवळा मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतो. कारण वाफवलेले आवळा नियमित खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. ज्याचा फायदा मधुमेहींचे आरोग्य रोखण्यास होतो. चला तर आवळ्याचे इतर आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.
वाफवलेल्या आवळ्याचे फायदे (Steamed Amla Benefits)
1. वाफवलेल्या आवळ्याचे सेवन केल्यास त्यातील अँटी ऑक्सिडंट आपल्या शरीराचे नुकसान करणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि फ्री रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करतात.
2. वाफवलेला १ आवळा नियमित खाल्ल्यास पचनक्रिया सुलभ होते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि आतड्यांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
3. खराब कोलेस्ट्रॉलमूळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबधी आजार होतात. (Steamed Amla Benefits) अशा आजारांपासून संरक्षण हवे असेल तर वाफवलेले एक आवळा नियमित खावा.
4. आवळा वाफवल्यावरसुद्धा त्यातील अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी कायम राहते. त्यामुळे असा आवळा नियमित खाल्ल्यास फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण मिळते. शिवाय याचा फायदा कोलजेन निर्मितीसाठी होतो. परिणामी, यातील नैसर्गिक रेडिअन्स त्वचेच्या समस्यांपासून संरक्षण देतात.
5. मधुमेहींबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्यासाठी वाफवलेले आवळा वरदान ठरतो. कारण, मधुमेहाने ग्रासलेल्या एखाद्या व्यक्तीने नियमित वाफवलेल्या आवळ्याचे सेवन केले तर त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आवळा वाफवल्यामुळे त्यातील सक्रिय संयुगे (ॲक्टिव्ह कंपाऊडस्) जपण्यास मदत होते. (Steamed Amla Benefits) परिणामी असा आवळा सर्व बाजूने मधुमेहींच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो.