सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून अजूनही महाविकास आघाडीचे स्टेरींग शिवसेनेच्याच हातात असल्याची कोपरखळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मारली. पोलिस दलाला गाड्या सूपूर्द प्रसंगी शहरात फेरफटका मारण्यात आला. यावेळी गाडीचे स्टेरींगवर स्वतः शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई यांनी ताबा घेतला होता. तर शेजारी राष्ट्रवादीचे आमदार व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील बसले होते.
सातारा पोलीस दलास जिल्हा नियोजन व विकास समिती मधुन 31 चारचाकी आणि 40 दुचाकी गाड्या देण्यात आल्या. जिल्हा नियोजनमधून 3 कोटी 20 लाख रूपयांचा निधी पोलिस प्रशासनासाठी वापरण्यात आला आहे. यावेळी शंभुराज देसाई यांनी सातारा शहरातून नविन गाडीतून फेरफटका मारला. या निमित्तानं गाडीचं स्टेरींग गृहराज्यमंत्र्याच्या हातात होतं तर शेजारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील बसले होते. या प्रसंगी शंभुराज देसाई यांनी अजुन ही स्टेरींग शिवसेनेच्याच हातात असल्याचा डायलाॅग मारत राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोपरखळी मारली. यावेळी या ठिकाणी एकच हशा पिकला. तसेच यावेळी कोरेगावचे आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखरसिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंन्सल हेही गाडीत होते.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, पोलिस दलाचे काम फार मोठे काम आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंर जिल्हा नियोजनमधील ठराविक निधी हा पोलिस प्रशासनासाठी वापरण्याचा नियम करण्यात आला. त्या अंतर्गंत 31 चारचाकी वाहने 40 दुचाकी यांची खरेदी करण्यात आले, त्याचबरोबर संगणक व कॅमेऱ्याचाही समावेश करण्यात आली आहेत. या अद्यावयात यंत्रणेमुळे पोलिसांना मोठे सहकार्य होणार असून लोकांच्या हितासाठी त्यांचा वापर होईल.
हेल्मेट वापरणे गरजेचेच : बाळासाहेब पाटील
अपघतात डोक्याला दुखापत होण्याचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. गेल्या 25 वर्षापासून हेल्मेट वापराविषयी सांगितले जात आहे, हे अत्यंत आवश्यक आहे. लोकांची प्रतिक्रिया येणे साहजिक आहेत, लोकांच्या सुरक्षितेसाठी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे.