Stock Market : सेन्सेक्स 365 तर निफ्टी 120 अंकांनी घसरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मंगळवारचा शेअर बाजारासाठी काही विशेष नव्हता. आज BSE चा Sensex 365.36 अंक म्हणजेच 0.70% घसरून 52,188.04 वर बंद झाला. त्याचबरोबर NSE Nifty 120.30 अंकांनी म्हणजेच -0.76% घसरून 15,632.10 वर बंद झाला. BSE च्या 30 पैकी आज केवळ 9 शेअर्समध्ये वाढ झाली आहे, 21 शेअर्स घसरणीने बंद झाले आहेत. त्याचबरोबर NSE तील 50 पैकी 40 शेअर्स रेड मार्कवर बंद झाले आहेत.

आज हे शेअर्स वाढले आहेत
BSE वर आज एशियन पेंटच्या शेअर्सनी 6.04% वाढ नोंदवली. यानंतर अल्ट्रा टेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज ऑटो, नेस्ले इंडिया, मारुती, टीसीएस, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. त्याचबरोबर इंडसइंड बँक, टाटा स्टील, एनटीपीसी, भारती एअरटेल, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, एचडीएफसी बँक, सन फार्मा, एसबीआय, डॉ. रेड्डी, बजाज फायनान्स, एलटी, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, टायटन, आयटीसी, रिलायन्सचे शेअर्स घसरले.

Top-5 गेनर्स आणि लूजर्स
आज NSE च्या टॉप गेनर्स कंपन्यांमध्ये एशियन पेंट, अल्ट्रा सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती आणि ग्रासिम यांचा समावेश आहे. त्याचबरोबर लूजर्स मध्ये आज हिंडाल्को, इंडसइंड बँक, टाटा स्टील, एनटीपीसी आणि भारती एअरटेलचे शेअर्स आहेत.

3,343 कंपन्यांच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग
BSE वर आज बाजार बंद होताना एकूण 3,343 कंपन्यांच्या शेअर्सची विक्री झाली. यामध्ये 1,139 कंपन्यांचे शेअर्स वाढले तर 2,095 कंपन्यांचे शेअर्स घसरणीवर बंद झाले. आजची एकूण मार्केटकॅप 2 कोटी 31 लाख रुपये आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment