Stock Market : Sensex 185 अंकांनी घसरला तर Nifty 15,749 वर बंद झाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आठवड्याच्या दुसर्‍या व्यापार दिवशी, स्थानिक शेअर बाजार (Share Market Closing) रेड मार्कवर बंद झाला. BSE Sensex 185.93 अंक म्हणजेच 0.35 टक्क्यांनी घसरून 52,549.66 वर बंद झाला. त्याचबरोबर NSE Nifty 65.15 अंकांनी किंवा 0.41 टक्क्यांनी घसरून 15,749.55 वर बंद झाला. बाजार बंद होताना BSE च्या 30 शेअर्स पैकी 12 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 18 शेअर्स घसरले. त्याचबरोबर NSE चे 50 पैकी 35 शेअर्स घसरणीने बंद झाले.

या शेअर्सची झाली वाढ
BSE वर ट्रेडिंग बंद होताना पॉवर ग्रिडचे शेअर्स 1.75 टक्क्यांनी वधारले. त्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, डॉ. रेड्डी, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, टायटन, एचडीएफसी, रिलायन्स, सन फार्मा आणि टीसीएसचे शेअर्स तेजीत आहेत.

त्याचबरोबर कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, बजाज ऑटो, एक्सिस बँक, एम अँड एम, एसबीआय, मारुती यांचे शेअर्स 1 टक्क्यांहून अधिक घसरले. तसेच टाटा स्टील, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्रा सिमेंट, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एलटी, एचसीएल टेक आणि आयटीसीचे शेअर्स रेड मार्कवर बंद झाले.

3,351 कंपन्यांच्या शेअर्समध्ये व्यापार
BSE वर दिवसाच्या व्यापारात मंगळवारी सुमारे 3,351 कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी झाली. यामध्ये 1,647 कंपन्यांचे शेअर्स वाढीने बंद झाले तर 1,585 कंपन्यांचे शेअर्स घसरणीने बंद झाले. आजची एकूण मार्केटकॅप 2 कोटी 29 लाख रुपये आहे.

आजचे Top-5 गेनर्स आणि लूजर्स
NSE मध्ये आज पॉवर ग्रिड, सिप्ला, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडसइंड बँक आणि डिव्हिस लॅब यांचे शेअर्स नफ्यात होते. दुसरीकडे आयओसी, ओएनजीसी, हिंडाल्को आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स तोट्यात राहिले. मेटल, पीएसयू, बँकिंग क्षेत्रातील शेअर्स आज जास्त घसरले आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment