नवी दिल्ली । बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर झाली. BSE सेन्सेक्स 33.96 अंक किंवा 0.06 टक्क्यांच्या किरकोळ घसरणीसह 61,682.09 वर उघडला. त्याच वेळी, NSE निफ्टी 13.45 अंक किंवा 0.07 टक्क्यांच्या किंचित घटाने 18,405.30 वर उघडला.
सुरुवातीच्या ट्रेडिंगदरम्यान, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, एसबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस यांना BSE वर नफा दिसून येत आहे.
दुसरीकडे, इंडसइंड बँक, एक्सिस बँक, बजाज फिनसर्व, बजाज ऑटो, टीसीएस, एचडीएफसी बँक, मारुती, एम अँड एम, रिलायन्स, टेक महिंद्रा, कोटक बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स, डॉ रेड्डीज, एनटीपीसी, टाटा स्टील, टायटनचे शेअर्स घसरले आहेत.
NSE वर आज टॉप गेनर्समध्ये ब्रिटानिया, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एसबीआय चे शेअर्स आहेत. त्याच वेळी, टॉप लुझर्समध्ये हिंडाल्को, हिरो मोटर, इंडसइंड बँक, एचर मोटर आणि कोल इंडियाचे शेअर्स आहेत. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाले तर आत्ता मेटल शेअर्समध्ये 1 टक्क्यांहून अधिक घट दिसून येत आहे.