Stock Market : IT शेअर्समध्ये गुंतवणूक करताय… जरा थांबा !!! तज्ञ काय म्हणतात ते पहा

Stock Market 
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market  : गेल्या महिन्यात निफ्टी 50 च्या तुलनेत निफ्टी आयटी इंडेक्सने खूप खराब कामगिरी केली आहे. चौथ्या तिमाहीत आयटी कंपन्यांच्या महसुलात कमी वाढ झली आहे. त्याचबरोबर कंपन्यांचे मार्जिन देखील खाली आले आहेत. कोरोनानंतर, आता व्याजदर वाढ आणि त्यामुळे मंदावलेली जागतिक अर्थव्यवस्था यामुळे भारतीय आयटी कंपन्यांवरील दबाव वाढत आहे.

Top Picks: Icici Securities Recommends These It Stocks To Buy | Mint

सध्या महागाई देखील वाढत आहे. अशातच व्याजदरात वाढ झाल्यामुळे जगभरातील बाजारपेठांवर देखील परिणाम होत आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाने देखील नीचांकी पातळी गाठली आहे. या सर्व कारणांमुळे निफ्टी आयटी शेअर्समधील घसरण थांबलेली नाही. इथे एक गोष्ट लक्षात घ्या कि, डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी आयटी इंडस्ट्रीसाठी चांगली मानली जाते. यामागील कारण असे कि परदेशात आयटी कंपन्यांची डॉलरमध्ये कमाई झाल्यामुळे त्यांच्या रुपयाचे मूल्य वाढते. Stock Market

Info Edge: Hottest internet stock in India surging despite valuation fears - The Economic Times

आयटी कंपन्यांच्या मार्जिनवर दबाव येण्याच्या शक्यतेमुळे, त्यांच्या व्यवस्थापनाकडून चांगले मार्गदर्शन मिळत असूनही आयटी सेक्टरची चमक कमी झाली आहे. कोरोना काळात जोरदार मागणी असतानाही आयटी कंपन्याना कर्मचाऱ्यांच्या पगारावरील वाढत्या खर्चाच्या दबावातून जावे लागत आहेत. सध्या आयटी कंपन्यांमध्ये जबरदस्त भरती होताना दिसत आहे. ज्यामुळे कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कायम ठेवणे अवघड जात आहे. ज्याचाही परिणाम त्यांच्या मार्जिनवर दिसून येत आहे. Stock Market

Top IT Stocks in India - Wealthpedia

शेअर मार्केट एक्सपर्ट असलेले अजय बग्गा यांनी एका न्यूआज चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीत भारतीय आयटी कंपन्यांची भविष्यातील स्थिती आणि दिशा याविषयी सावधगिरी बाळगण्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की,”आयटी क्षेत्र तळाला गेले आहे असे सध्या तरी म्हणता येणार नाही. मात्र या क्षेत्रात आणखी घट होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे त्यांनी गुंतवणूकदारांना आयटी क्षेत्रातील गुंतवणुक करण्यासाठी वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे. बग्गा असेही म्हणाले की,” गुंतवणूकदारांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीवर लक्ष ठेवावे.” Stock Market

शेअर मार्केटच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.nseindia.com/market-data/live-market-indices

हे पण वाचा :

Online Shopping वेबसाइट्सवरील fake reviews ना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

Cruise Drugs Case : मुंबई ड्रग्ज प्रकरणात NCB कडून आर्यन खानला क्लीन चिट !!!

Business Idea : ‘या’ शेतीद्वारे कमी खर्चात मिळवा 5 पट नफा !!! कसे ते जाणून घ्या

Banking fraud : बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर बंद झालाय ??? अशा प्रकारे करा अपडेट

RBI : खुशखबर !!! आता घर दुरुस्त करण्यासाठी देखील मिळणार 10 लाखांपर्यंतचे कर्ज