Stock Market : दिवसभरातील अस्थिरतेच्या दरम्यान बाजार ग्रीन मार्कमध्ये बंद

0
45
Share Market
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजारातील अस्थिरतेच्या दरम्यान सेन्सेक्स, निफ्टी आज ग्रीन मार्कमध्ये बंद होण्यात यशस्वी झाले. आजच्या ट्रेडिंगमध्ये पॉवर, रियल्टी, ऑटो शेअर्समध्ये विक्री झाली तर आयटी शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली. दुसरीकडे, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. त्यामुळे निफ्टी बँक 241 अंकांनी घसरून 36,549 वर बंद झाला.

ट्रेडिंगच्या शेवटी, सेन्सेक्स 113.11 अंकांच्या किंवा 0.20 टक्क्यांच्या वाढीसह 57,901.14 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 27.00 अंकांच्या किंवा 0.16 टक्क्यांच्या मजबूतीसह 17,248.40 वर बंद झाला.

सेन्सेक्स 455 अंकांनी उघडला
सकाळी 455 अंकांनी सेन्सेक्स 58,243 वर उघडला. या दरम्यान त्याने 58,337 ची वरची पातळी आणि 57,683 ची खालची पातळी केली. त्याच्या 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स घसरणीत बंद झाले आणि 15 शेअर्स वाढले. वाढत्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स, इन्फोसिस, टायटन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज प्रमुख आहेत. घसरलेल्या शेअर्समध्ये बजाज ऑटो, मारुती, इंडसइंड बँक आणि सन फार्मा यांचा समावेश आहे.

निफ्टी 108 अंकांनी वधारला
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने दिवसभरात 17,379 ची वरची तर 17,184 ची खालची पातळी केली. त्याच्या 50 शेअर्सपैकी 28 वाढीसह बंद झाले तर 22 घसरणीसह राहिले. इन्फोसिस, बजाज फायनान्स, भारत पेट्रोलियम आणि रिलायन्स इंडस्ट्रीज टॉप गेनर्समध्ये होते. सन फार्मा, हिंदाल्को, सिप्ला आदी शेअर्समध्ये घसरण झाली.

आजच्या ट्रेडिंगमध्ये बेस मेटलच्या कींमतीत वाढ दिसून आली. LME वर एल्युमिनियमची किंमत 3 दिवसांपेक्षा जास्त आहे. LME वर झिंकची किंमत देखील 2 दिवसांच्या उच्चांकावर आहे. शिशाच्या दरानेही 4 दिवसांचा उच्चांक गाठला आहे. निकेल, कॉपर आणि टिनचे भाव 2 दिवसांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. MCX वर शिशाची किंमत 5 दिवसांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. MCX वर कॉपरच्या किंमती चार दिवसांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here