मुंबई । आठवड्यातील पहिल्या व्यापारी दिवशी देखील सोमवारी बाजारातील अस्थिरता कायम राहिली. सेन्सेक्स 127.31 अंकांनी घसरून 58177.76 वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 13.95 अंकांच्या घसरणीसह 17355.30 वर बंद झाला. आज बाजाराला आयटी आणि मेटल क्षेत्राची साथ मिळाली. त्यामुळे बाजाराला खालच्या स्तरावरून आधार मिळाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे 300 अंकांनी खाली आला, जो नंतर सावरला.
आजच्या ट्रेंडींगमध्ये COALINDIA, HINDALCO, BHARTIARTL, TCS हे निफ्टीचे टॉप गेनर पैकी होते तर RELIANCE, ICICIBANK, SBILIFE, HINDUNILVR आणि HDFCBANK हे निफ्टीचे टॉप लुझर ठरले. व्यापार सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बाजारात कंसोलिडेशनचा मूड दिसून आला. मात्र, मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये वाढ झाली.
रुची सोया स्टॉक्स 3 टक्क्यांहून अधिक वाढला
केंद्र सरकारने पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेलावर आयात शुल्क कमी केल्याच्या घोषणेमुळे सोमवारी पतंजलीची कंपनी रुची सोयाचे स्टॉक्स 3 टक्क्यांहून अधिक वाढले. ते सुमारे 4,350 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले गेले.
आसाम, त्रिपुरा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाम तेलाच्या उत्पादनासाठी लागवड सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. रुची सोयाला अलीकडेच बाजार नियामक सेबीकडून 4,300 कोटी रुपयांच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफरसाठी परवानगी मिळाली.