Stock Market : शेअर बाजार रेड मार्कवर, गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे सेन्सेक्स- निफ्टीत घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जागतिक बाजाराच्या दबावाखाली सोमवारी भारतीय शेअर बाजार रेड मार्क वर खुला झाला. गुंतवणूकदारांच्या प्रॉफिट-बुकिंगमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण दिसून आली.

सकाळी 114 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्सने 59,333 वर खुले ट्रेडिंग सुरू केले, तर निफ्टीने 43 अंकांच्या घसरणीसह 17,741 वर ट्रेडिंग सुरू केला. बाजारातील घसरण पाहून गुंतवणूकदार विक्रीच्या मार्गावर आले, त्यामुळे दोन्ही एक्सचेंजमधील तोट्याची व्याप्ती आणखी वाढली. सकाळी 9.25 वाजता सेन्सेक्स 379 अंकांनी घसरून 59,068 वर, तर निफ्टी 89 अंकांनी घसरून 17,695 वर गेला.

आयटी क्षेत्र दबावाखाली
गुंतवणूकदारांनी आज सुरुवातीच्या ट्रेडिंग मध्ये आयटी क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केली, त्यामुळे आयटी क्षेत्रात दबाव दिसून येत आहे. मात्र, ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सनी बाजारात हाहाकार माजवला. इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि एचडीएफसी या शेअर्समध्ये सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये मोठी घसरण दिसून आली, ज्यामुळे हे शेअर्सटॉप लूजर्सच्या श्रेणीत आले.

‘या’ शेअर्समध्ये बेटिंग
दुसरीकडे, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, ग्रासिम इंडस्ट्रीज, सिप्ला आणि एनटीपीसी यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे आणि हे शेअर्स टॉप गेनर्सच्या श्रेणीत पोहोचले आहेत. इस्रोच्या प्रकल्पावर मोठ्या निविदा आल्याने हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या शेअर्समध्ये 52 आठवड्यांची उंची दिसून येत आहे. बीएसईवर घसरणीची स्थिती अशी होती की, आज सेन्सेक्समधील 30 पैकी 19 शेअर्स रेड मार्कवर ट्रेड करत आहेत.

मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडातील विक्रमी गुंतवणुकीला बाजारातून सपोर्ट मिळत आहे. यामुळेच जागतिक बाजाराचा दबाव असतानाही बाजारात मोठी घसरण झालेली नाही. मार्चमध्ये, इक्विटी म्युच्युअल फंडातच 28,464 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. आज रुची सोया आणि अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांहून अधिची उसळी पाहायला मिळत आहे.

आशियाई बाजारात घसरण दिसून आली
सोमवारी सकाळी आशिया खंडातील सर्वच बाजारात घसरणीचे वातावरण आहे. सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये आज सकाळच्या ट्रेडिंगमध्ये 0.30 टक्क्यांची घसरण झाली. जपानचा निक्कीही 0.57 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होता. एवढेच नाही तर हाँगकाँगच्या बाजारात 1.85 टक्के आणि तैवानमध्ये 0.31 टक्के घसरण झाली आहे. दक्षिण कोरियाच्या कोस्पी स्टॉक एक्सचेंजमध्ये 0.30 टक्के आणि चीनच्या शांघाय कंपोझिटमध्ये 1.20 टक्क्यांची घसरण होत आहे.

Leave a Comment