Stock Market : बाजार उघडताच सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, निफ्टीही 202 अंकांच्या तोट्यात

Stock Market
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जागतिक घटक आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या दबावाखाली शुक्रवारी सकाळपासून भारतीय शेअर बाजारात विक्रीचे वर्चस्व होते. गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले.

सुरुवातीच्या सत्रातच बाजार 700 अंकांच्या खाली गेला. सकाळी 449 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्सने 54,653.59 वर ट्रेड सुरू केला, तर निफ्टी 159 अंकांच्या घसरणीसह 16,339.45 वर उघडला. यानंतरही विक्रीचा दबदबा राहिला आणि सकाळी 9.32 वाजता सेन्सेक्स 868 अंकांनी घसरून 54,234 वर पोहोचला.

प्री-ओपनिंगमध्येच बाजार कोसळला
कमकुवत जागतिक संकेतांमध्‍ये प्री-ओपनिंग सत्रातच बाजार घसरला. रात्री 09:01 च्या सुमारास सेन्सेक्स 666.69 अंकांनी म्हणजेच 1.21 टक्क्यांनी घसरून 54,435.99 च्या पातळीवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, निफ्टी 282.10 अंकांनी किंवा 1.71 टक्क्यांनी घसरून 16215.90 च्या पातळीवर आला होता.

गुंतवणूकदार येथे पैज लावत आहेत
रशिया-युक्रेन युद्धामुळे बेस मेटल सतत वाढत आहेत. एल्युमिनियम सर्वकालीन उच्च पातळीवर आहे. बाजारातील घसरणीमुळे मेटल इंडेक्स वगळता इतर सर्व क्षेत्रांत कमजोरी दिसून आली. बँकिंग आणि ऑटो शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे, तर मेटल स्टॉक्स 2 टक्क्यांपर्यंत वाढताना दिसत आहेत.

आशियाई बाजारातही मोठी घसरण
आशियातील सर्व प्रमुख बाजारांनी शुक्रवारी मोठ्या घसरणीसह ट्रेड सुरू केला. सिंगापूरचा SGX निफ्टी 2.33 टक्के आणि जपानचा NIKKEI 2.55 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. त्याचप्रमाणे, तैवानच्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये 0.88 टक्के आणि दक्षिण कोरियाच्या कोस्पीमध्ये 1.41 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे.