Stock Market – सेन्सेक्स 198 अंकांनी वाढून 58,664 वर तर निफ्टी 17,503 च्या वर बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सोमवारी मोठ्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजार थोडासा सावरताना दिसला. दिवसभराच्या अस्थिरतेनंतर, BSE चा सेन्सेक्स 198.44 अंकांच्या किंवा 0.34 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याच वेळी, NSE चा निफ्टी 86.80 अंक किंवा 0.5 टक्क्यांच्या वाढीसह 17,503.35 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर्स वाढीने बंद झाले तर 10 शेअर्समध्ये घसरण झाली.

‘या’ शेअर्समध्ये वाढ झाली आहे
आज BSE वर पॉवर ग्रिड, NTPC, Tata steel, Bharti Airtel, Sun Pharma, Bajaj Finserv, LT, SBI, Kotak Bank, Tech Mahindra, Reliance, Nestle India, Bajaj Finance, HDFC, HCL Tech, ITC, DR. रेड्डी, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि अल्ट्रा सिमेंटचे शेअर्स वधारले. तर दुसरीकडे, इंडसइंड बँक, एशियन पेंट, इन्फोसिस, बजाज ऑटो, मारुती, एमअँडएम, टायटन, एक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स घसरले.

‘या’ IPO ची शेअर बाजारात जबरदस्त एंट्री
Latent View Analytics च्या शेअर्सने मंगळवारी शेअर बाजारात धमाका केला. कंपनीचे शेअर्स त्याच्या इश्यू प्राईसपेक्षा 169% जास्त किंमतीसह Rs 530 वर लिस्ट झाले आणि नंतर ते 179% पर्यंत वाढले. जरी त्याचे शेअर्स नंतर ट्रेडिंगच्या वेळी 489.1 रुपयांपर्यंत खाली आले, मात्र ते त्याच्या इश्यू प्राईसच्या 148.3 टक्के प्रीमियमवर देखील ट्रेडिंग करत आहे.

Leave a Comment