नवी दिल्ली । आज बुधवारीही बाजारात अस्थिरता होती. सकाळी मजबूतीसह खुला झालेला बाजार सायंकाळी घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स 68.62 अंकांच्या घसरणीसह 57232.06 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 28.95 अंकांनी घसरून 17063.25 वर बंद झाला. दुपारी 17,200 च्या पातळीला स्पर्श केल्यानंतर निफ्टी खाली घसरला. मग ही घसरण थेट रेड मार्कवर जाऊन बंद झाली.
निफ्टी सलग सहाव्या दिवशी घसरणीवर बंद झाला आहे. आजच्या ट्रेडिंगमध्ये ऑटो, कॅपिटल गुड्स शेअर्स टॉप लूझर ठरले आहेत. तर दुसरीकडे, मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्स काठावर बंद होण्यात यशस्वी झाले. बाजाराची सुरुवात आज वाढीने झाली. 09:16 वाजता सेन्सेक्स 332.26 अंकांच्या किंवा 0.58 टक्क्यांच्या वाढीसह 57,632.94 वर ट्रेड करत होता. दुसरीकडे, निफ्टी 100.35 अंकांच्या किंवा 0.59 टक्क्यांच्या वाढीसह 17192.55 च्या पातळीवर दिसला.
जागतिक कारणांमुळे प्रचंड अस्थिरता
मार्केट एक्पसपर्टच्या मते, रशिया आणि युक्रेनमधील संकटामुळे बाजारातील अस्थिरतेचा अंदाज बांधणे कठीण आहे. उद्या निफ्टीची स्थिती कशी असेल हे युक्रेनच्या संकटाच्या नव्या डेव्हलपमेंटवर अवलंबून आहे. सध्या नवीन अपडेटनुसार रशियाने राजनैतिक चर्चेसाठी सहमती दर्शवली आहे, अशा बातम्या बाजारात येत आहेत. चर्चेचे सकारात्मक परिणाम दिसून आले तर भारतीय बाजारात तेजी पाहायला मिळू शकते.
मात्र सध्या युक्रेनच्या संकटावर सकाळी काही अपडेट आहे आणि संध्याकाळी आणखी काही अपडेट येते त्यामुळे आजची स्थिती जागतिक संकटामुळे घेतली आहे आणि ट्रेंडमुळे उद्या या स्थितीचे काय होईल हे सांगणे कठीण आहे.