नवी दिल्ली । सोमवारीही भारतीय शेअर बाजाराची सुरुवात कमकुवतपणाने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी तोट्यासह उघडले आणि अल्पावधीतच मोठी घसरण गाठली.
जागतिक बाजाराच्या दबावाखाली सोमवारी गुंतवणूकदारांवर विक्री आणि नफावसुलीचे वर्चस्व राहिले. सेन्सेक्स 281 अंकांनी तर निफ्टी 84 अंकांच्या घसरणीसह उघडला. अल्पावधीतच बाजाराने डुबकी मारण्यास सुरुवात केली आणि व्यवसाय सुरू झाल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांतच दोन्ही एक्सचेंजेसमध्ये मोठी घसरण दिसून आली. सकाळी 9.24 वाजता सेन्सेक्स 457 अंकांच्या घसरणीसह 57,371 वर ट्रेड करत होता. निफ्टीही 143 अंकांनी घसरून 17,133 वर पोहोचला होता.
‘या’ शेअर्सपासून गुंतवणूकदार पळत आहेत
बाजारातील घसरणीच्या काळात गुंतवणूकदार हिरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, एचडीएफसी लाईफ, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि विप्रो यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्सपासून दूर पळत आहेत. दुसरीकडे, डॉ रेड्डीज लॅब्स, एनटीपीसी, टीसीएस, पॉवर ग्रिड कॉर्प आणि इंडसइंड बँक यांच्या शेअर्सची खरेदी सातत्याने वाढत आहे.
आशियाई बाजारही रेड मार्कवर
सोमवारी बहुतांश आशियाई बाजार घसरणीसह उघडले आहेत. सिंगापूरच्या स्टॉक एक्स्चेंजवर 0.84 टक्के, जपान 0.99 टक्के, हाँगकाँगमध्ये 1.88 टक्क्यांची सुरुवातीची घसरण झाली. याशिवाय दक्षिण कोरियाचे शेअर बाजारही 0.67 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते.