Stock Market : सेन्सेक्स 78 अंकांनी घसरला तर निफ्टी 17550 च्या खाली बंद झाला

0
31
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । एक दिवसाच्या चढउतारानंतर बुधवारी शेअर बाजार रेड मार्कवर बंद झाला. आजचे ट्रेडिंग संपल्यावर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 77.94 अंक किंवा 0.13 टक्क्यांनी खाली 58,927.33 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 15.35 अंक किंवा 0.09 टक्के खाली 17,546.65 वर बंद झाला.

बुधवारच्या ट्रेडिंगमध्ये रिअल्टी स्टॉक उत्साहाने भरले आणि रिअल्टी इंडेक्स 8 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. दुसरीकडे, लहान आणि मध्यम शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. बीएसई मिडकॅप इंडेक्स 1.51 टक्क्यांच्या वाढीसह आणि स्मॉल कॅप इंडेक्स 1.19 टक्क्यांनी बंद झाला.

एका दिवसापूर्वी सेन्सेक्स 59005.27 वर बंद झाला
मंगळवारी भारतीय शेअर बाजारात खालच्या स्तरावरून मोठी सुधारणा झाली. ट्रेडिंग संपल्यावर सेन्सेक्स 514.34 अंकांनी उडी मारून 59005.27 वर बंद झाला तर निफ्टी 165.10 अंकांनी चढून 17,560 वर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here