नवी दिल्ली । सणासुदपूर्वी शेअर बाजारात प्रचंड उत्साह आहे. बाजाराने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. BSE Sensex ने पहिल्यांदाच 60 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सेन्सेक्स 375.05 अंक किंवा 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 60,260.41 वर उघडला. त्याच वेळी, NSE निफ्टी 100.55 अंकांच्या वाढीसह 17,923.50 वर उघडला आहे.
सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाले तर आज बहुतेक आयटी शेअर्स तेजीत आहेत. आयटी शेअर्समध्ये 2% ची वाढ आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समध्ये 1% ची वाढ आहे. रिअल्टी स्टॉक 2.48 टक्क्यांनी वाढले आहेत.
एकूण 2,716 कंपन्यांचे शेअर्स BSE वर ट्रेडिंग करत आहेत. यापैकी 1,716 कंपन्यांचे शेअर्स वर आहेत आणि 882 कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. आजची मार्केट कॅप 2 कोटी 62 लाखांच्या जवळपास आहे.
निफ्टी मिड कॅप, निफ्टी बँक, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसमध्ये वाढ झाली आहे. निफ्टीच्या 50 पैकी 38 शेअर्समध्ये नफा दिसून येत आहे. त्याचबरोबर 12 शेअर्समध्ये घसरण आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर आज म्हणजेच शुक्रवारी जारी करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 19 व्या दिवशी डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. आज डिझेलचे दर 20 ते 21 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. त्याचबरोबर पेट्रोलचे दर स्थिर राहिले.