नवी दिल्ली । बुधवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. दिवसभराच्या ट्रेडिंग मधील चढ-उतारानंतर बीएसई 30 शेअर्सचा सेन्सेक्स 80.63 अंक किंवा 0.13 टक्क्यांनी घसरून 60352.82 वर बंद झाला. यासह, NSE चा निफ्टी देखील 34.45 अंक किंवा 0.20 टक्क्यांनी घसरला आणि 18008.80 स्तरावर बंद झाला.
मंगळवारीही बाजार घसरणीसह बंद झाला
मंगळवारीही शेअर बाजार रेड मार्कमध्ये बंद झाले. सेन्सेक्स 112.16 अंकांनी घसरून 60433.45 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 24.30 अंकांच्या घसरणीसह 18044.25 वर बंद झाला. बाजाराची सुरुवात मजबूत झाली मात्र दिवसभरात नफावसुलीचे वर्चस्व राहिले आणि सेन्सेक्स-निफ्टी अस्थिरतेत रेड मार्कवर बंद झाले.
आज बाजाराची सुरुवात संथ होती
आज शेअर बाजाराची सुरुवात मंदावली होती. BSE सेन्सेक्स 359.37 अंकांनी किंवा 0.59 टक्क्यांनी घसरून 60,074.08 वर उघडला. त्याच वेळी, NSE चा निफ्टी 94.65 अंकांनी किंवा 0.52 टक्क्यांनी घसरून 17,949.60 वर उघडला. बीएसईवर सकाळी 9.20 वाजता 30 शेअर्सपैकी फक्त 3 शेअर्स वाढ दाखवत आहेत. उर्वरित 27 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. M&M च्या स्टॉकने सर्वाधिक 1 टक्क्यांनी झेप घेतली आहे. त्याचवेळी सर्वात मोठी घसरण एचडीएफसीच्या शेअरमध्ये झाली आहे.
सेन्सेक्समधील 30शेअर्स पैकी 13 शेअर्स वधारले
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्यापैकी भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, सन फार्मा, रिलायन्स, ITC, DRREDY, बजाज फायनान्स, एक्सिस बँक, टेक महिंद्रा, HDFC बँक आणि इतर होते. घसरलेल्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये टाटा स्टील, कोटक बँक, एचडीएफसी बँक, मारुती, आयसीआयसीआय बँक आणि इंडसइंड बँक यांचा समावेश आहे.