नवी दिल्ली । भारतीय बाजारांची आज जोरदार सुरुवात झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा सेन्सेक्स 231.28 अंकांनी म्हणजेच 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 58,880.96 वर उघडला. बीएसईच्या 30 पैकी 21 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी (NIFTY) देखील 60.85 अंकांच्या वाढीसह 17,530.60 वर ट्रेड करत आहे.
बुधवारी बाजाराची वाटचाल कशी होती
काल म्हणजेच 8 डिसेंबरला सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली. RBI ने दरांमध्ये कोणताही बदल न करता तो विक्रमी पातळीवर ठेवला. यासह, त्याची भूमिका देखील वाढीला सपोर्ट देण्यासाठी अनुकूल राहिली. RBI च्या या भूमिकेचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
ट्रेडिंगच्या शेवटी, सेन्सेक्स 1,016.03 अंकांच्या किंवा 1.76% च्या वाढीसह 58,649.68 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 293.10 अंक किंवा 1.71% च्या मजबूतीसह 17,469.80 वर बंद झाला. कालच्या ट्रेडिंगमध्ये सर्व सेक्टरल इंडेक्स ग्रीन मार्कमध्ये बंद झाले. निफ्टी ऑटो आणि पीएसयू बँक 2 टक्क्यांनी वधारले. बीएसईच्या सेक्टरल इंडेक्सवर नजर टाकल्यास, आयटी आणि ऑटो 2 टक्क्यांनी वधारले तर FMCG, हेल्थकेअर, मेटल, ऑइल अँड गॅस आणि रिअल्टी 1 टक्क्यांहून जास्तीने वाढले.
निफ्टीचे टॉप गेनर्स आणि लूझर्स येथे आहेत
M&M, BPCL, Asian Paints, Reliance Industries आणि UltraTech Cement हे निफ्टी वर टॉप गेनर्स ठरले आहेत तर TCS, Hindalco, HDFC बँक, Divis Labs आणि Tech Mahindra हे टॉप लूझर्स आहेत.
‘हे’ शेअर्स वाढले आहेत
आज BSE वर LT चा स्टॉक 0.61 टक्क्यांनी वर आहे. याशिवाय आजच्या ट्रेडिंगमध्ये एशियन पेंट्स, रिलायन्स, डॉ रेड्डी, INFY, सन फार्मा, HDFC, अल्ट्रा सिमेंट इत्यादींचे शेअर्स वधारत आहेत. त्याचवेळी एनटीपीसी, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, टीसीएस आणि मारुतीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.