नवी दिल्ली । गुरुवार, 7 एप्रिल रोजी श्री रेणुका शुगर्सचे शेअर्सही वाढले. अवघ्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 35 टक्क्यांनी वाढला आहे. सरकारच्या 2025 मध्ये इथेनॉल कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या घोषणेमुळे साखरेच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. श्री रेणुका शुगर्सच्या शेअरने गुरुवारी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठुन 49.50 रुपयेवर पोहोचला. आज त्यात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे
श्री रेणुका शुगर्सच्या शेअर्सनी केवळ एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअर्सने या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 385 टक्के बंपर रिटर्न दिला आहे. गेल्या दोन वर्षांत या शेअर्सने 800 टक्के नफा गुंतवणूकदारांच्या झोळीत टाकला आहे. त्याचबरोबर भविष्यातही हा शेअर आणखी वाढू शकतो, असे बाजार विश्लेषकांचे मत आहे.
यामुळे शेअर्स वाढत आहे
इथेनॉलचे ब्लेंडिंग आणि साखरेचा एमएसपी 31 रुपये असल्याने या साखरेच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. भारतातील इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमामुळे देशातील साखर उद्योग पूर्णपणे बदलेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय 2021-22 च्या हंगामात उसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेचे उत्पादन झाले आहे. 2025 मध्ये इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमाच्या अनिवार्य अंमलबजावणीच्या घोषणेचा साखर कंपन्यांच्या शेअर्सना मोठा फायदा झाला आहे.
आणखी वाढ होण्याची क्षमता
झी बिझने दिलेल्या वृत्तानुसार, स्वस्तिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे संतोष मीना सांगतात की,” श्री रेणुका शुगरचे शेअर्स डेली चार्टवर सतत वाढतच आहे. एकूण रचना खूपच आकर्षक आहे कारण हा स्टॉक त्याच्या 100, 200 SMA मूव्हिंग सरासरीच्या वर ट्रेड करत आहे. त्याचा डिमांड झोन देखील 35 च्या जवळ आहे. हे सर्व पाहता येत्या काळात तो 50 रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो.” मीना यांच्या मते, जर आपण घसरणीबद्दल बोललो, तर तो 35 रुपयांची पातळी मोडू शकतो आणि यासाठी 31 रुपये क्रिटिकल झोन आहे.
श्री रेणुका शुगर्स ही देशातील सर्वात मोठ्या साखर कंपन्यांमध्ये गणली जाते. इथेनॉल क्षमता वाढवण्यावर कंपनीचा भर आहे. सरकारने 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंग अनिवार्य केले आहे. सध्या ते 7.79 टक्के आहे. श्री रेणुका शुगर्स लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी साखर उत्पादक आणि रिफायनर्सपैकी एक आहे. ही सिंगापूरच्या Wilmar Sugar Holdings Pte Ltd ची उपकंपनी आहे.