हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market Update : येणाऱ्या आठवड्यात जर आपल्याला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्याआधी या आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण दिसून येईल की त्यामध्ये वाढ होईल हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल… जागतिक संकेत आणि FII चा कल यामुळे येत्या आठवड्यात बाजाराची दिशा ठरेल. याशिवाय, मंथली डेरिव्हेटिव्ह सेटलमेंटमुळे देशांतर्गत बाजारात अस्थिरता दिसू शकेल असेही बाजारातील जाणकारांनी म्हंटले आहे.
भारतीय बाजारपेठ चांगल्या स्थितीत
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे रिसर्च प्रमुख संतोष मीना म्हणाले की,”जागतिक अर्थव्यवस्थेमुळे होणारी चलनवाढ तसेच जगभरातील बाजारपेठेतील मंदीमुळे सध्या चिंतेचे वातावरण आहे. याच कारणांमुळे विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडूनही सतत विक्री केली जात आहे. मात्र, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी योग्य वेळी सपोर्ट केल्यामुळे भारतीय बाजारपेठा सध्या चांगल्या स्थितीत दिसत आहेत. Stock Market Update
5 आठवड्यांच्या घसरणीनंतर निफ्टीमध्ये झाली वाढ
संतोष मीना यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही सत्रांमध्ये स्थानिक बाजारपेठांमध्ये बरीच अस्थिरता दिसून आली आहे. मात्र, पाच आठवड्यांच्या घसरणीनंतर निफ्टीमध्ये जवळपास तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये 1,532.77 अंकांनी किंवा 2.90 टक्क्यांनी वाढ झाली तर निफ्टी 484 अंकांनी किंवा 3.06 टक्क्यांनी वाढला.
डॉलर इंडेक्समुळे दिशा मिळू शकेल
ते पुढे म्हणाले की,”मंथली डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सच्या सेटलमेंटमुळे या आठवड्यात देशांतर्गत बाजारात काही प्रमाणात अस्थिरता असेल. जागतिक आघाडीवर फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीचा तपशील 25 मे रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे, जो बाजाराच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असेल. याशिवाय डॉलर इंडेक्समुळे देखील बाजाराला दिशा मिळू शकेल. Stock Market Update
‘या’ कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल येतील
या आठवड्यात SAIL, Zomato, Adani Ports, Deepak Fertilizers, InterGlobe Aviation, Hindalco, NMDC, GAIL आणि गोदरेज इंडस्ट्रीजच्या तिमाहीचे निकाल येतील.
तज्ञांचे काय मत आहे ?
रेलिगेअर ब्रोकिंगचे रिसर्च व्हाइस प्रेसिडेंट अजित मिश्रा म्हणाले की,” जागतिक कल, तिमाही निकालांचा अंतिम टप्पा आणि रशिया-युक्रेन युद्धाचा बाजाराच्या दिशेवर परिणाम होईल.” सॅमको सिक्युरिटीजच्या इक्विटी रिसर्चच्या प्रमुख येशा शाह म्हणाल्या, “गेल्या आठवड्यात बाजार अस्थिर होता. मॅक्रो इकॉनॉमिक डेटा, चालू तिमाही निकालांचा हंगाम आणि डेरिव्हेटिव्ह सेटलमेंटमुळे या आठवड्यातही असाच कल राहण्याची शक्यता आहे.” Stock Market Update
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/market-data/live-market-indices
हे पण वाचा :
Airtel Price Hike : Airtel च्या ग्राहकांना पुन्हा बसणार धक्का, प्रीपेड प्लॅन्स आणखी महागणार
Dental Health Insurance: दातांच्या उपचारांसाठी PNB MetLife ने लाँच केला डेंटल हेल्थ इन्शुरन्स प्लॅन
farmer: म्हणून तरुण शेतकऱ्याने कांदा सरळ जनावरांपुढे टाकून दिला..