Petrol Diesel Price : केंद्रानंतर आता ‘या’ राज्यांनीही कमी केले पेट्रोल – डिझेलचे दर, कुठे सर्वात स्वस्त अन कुठे महाग ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळ सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरील (Petrol Diesel Price) राज्य करात अनुक्रमे 2.41 रुपये आणि 1.36 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे, राजस्थान सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) प्रति लिटर 2.48 रुपये आणि डिझेलवर 1.16 रुपयांनी कमी केला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरने कमी केल्याची घोषणा केल्यानंतर दोन्ही राज्यांनी हा निर्णय घेतला आहे.

केरळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर –

आज केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोलचा दर 107.71 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 96.52 रुपये प्रति लिटर आहे. Petrol Diesel Price

राजस्थान मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर –

राजस्थानमध्ये आता पेट्रोल 108.48 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 93.72 रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे. सीएम गेहलोत यांनी ट्विट करून लिहिले की, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज कपात केल्यामुळे राज्य सरकार पेट्रोलवर प्रति लिटर 2.48 रुपये आणि डिझेलवर 1.16 रुपये प्रति लिटर व्हॅट कमी करेल. त्यामुळे राजस्थानमध्ये पेट्रोल 10.48 रुपयांनी तर डिझेल 7.16 रुपयांनी स्वस्त होणार आहे.

प्रमुख महानगरांमधील किमती (Petrol Diesel Price) –

  • आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे.
  • मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे.
  • कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे.
  • चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

महत्वाच्या बातम्या –

भारतातील ‘या’ ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी घ्यावी लागते थेट जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी; कांदा, बटाट्याची किंमत ऐकाल तर…

Monkeypox Virus : आता ‘या’ भयानक आजाराने वाढवलं जगाचं टेन्शन; माकडांपासून आलेल्या व्हायरस बाबत जाणून घ्या

Gold Loan : पैशांची गरज भासतेय ??? ‘या’ बँकांकडून स्वस्त दरात मिळेल गोल्ड लोन

फुकटात सिगरेट न दिल्याने युवकाचा टपरी चालकावर हल्ला! CCTV फुटेज आले समोर

Car Loan : खुशखबर !!! आता अवघ्या 30 मिनिटांत मिळणार कार लोन

Leave a Comment