हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Tips :सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. यादरम्यान बाजारात जोरदार खरेदी केली जाते. ज्यामुळे शेअर बाजार तेजीत राहण्याची शक्यता आहे. डॉमेस्टिक ब्रोकरेज फर्म असलेल्या एक्सिस सिक्युरिटीजने यादरम्यान काही निवडक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे एक्सिस सिक्युरिटीजचा विश्वास आहे की, येत्या काही दिवसांत उपभोगावर आधारित कंपन्यांचे शेअर्स सध्याच्या किंमतीपासून 21 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतील. याबरोबरच या महिन्यांत अनेक भारतीय कंपन्यांकडून जून-सप्टेंबर 2022 च्या तिमाहीचे निकालही जाहीर केले जातील. ज्याचा परीणाम या कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून येईल.
ऑटो सेक्टरमध्ये मजबूत पकड असलेल्या मारुती सुझुकीवर एक्सिस सिक्युरिटीकडून विश्वास व्यक्त केला गेला आहे. अलीकडेच मारुती सुझुकीकडून मिड एसयूव्ही सेगमेंटमधील कॉम्पॅक्ट ब्रेझा लॉन्च कऱण्यात आहे. त्याचबरोबर FY25E पर्यंत कंपनी आपला गमावलेला बाजार हिस्सा परत मिळवण्यासाठी जोरदार तयारी देखील करतआहे. यामुळे एक्सिस सिक्युरिटीकडून मारुती सुझुकीच्या स्टॉकला 10270 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. Stock Tips
या ब्रोकरेज हाऊसने सीसीएल उत्पादनांबाबत खरेदी करण्याचे मत देताना त्यासाठी 600 रुपयांची टार्गेट प्राईस ठेवली आहे. ही कंपनी आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपले स्थान पक्के करत आहे. Stock Tips
सिमेंट क्षेत्रातील कंपनी असलेल्या दालमिया भारतवर या ब्रोकरेज हाऊसने बेट लावण्याचा सल्ला दिला आहे. एक्सिस सिक्युरिटीच्या मते, आर्थिक पुनरुज्जीवना दरम्यान, कंपनीने ट्रेड आणि नॉन ट्रेड अशा दोन्ही विभागांना मागे टाकणे अपेक्षित आहे. ज्यामुळे कंपनीचे उत्पन्न आणि नफा देखील वाढेल. या साठी 1850 रुपयांच्या टार्गेटसह बाय कॉल देण्यात आला आहे. Stock Tips
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोळशाच्या वाढलेल्या किंमतीमुळे कोल इंडियाला भरपूर फायदा होईल. त्याच वेळी, कोल इंडियाचे पुढील लक्ष जास्त किंमतीच्या भूमिगत कोळसा खाणी बंद करणे आणि मोठ्या खुल्या खाणींच्या विस्तारावर आहे. या गोष्टी लक्षात घेऊनच खरेदीचा सल्ला देताना त्यासाठी 262 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. Stock Tips
एक्सिस सिक्युरिटीकडून बाटा इंडियामध्ये खरेदी करण्यास सांगितले आहे. कंपनीची बॅलन्सशिट मजबूत आहे. तसेच अनेक छोट्या शहरांमध्ये देखील कंपनी आपल्या स्टोअरचा विस्तार करत आहे. त्यामुळे बाजारातील त्याचा हिस्सा वाढेल. या शेअरला 200 रुपयांचे टार्गेट दिले आहे. Stock Tips
एक्सिस सिक्युरिटीजचा असा विश्वास आहे की, टेक महिंद्राकडे सेवांची विस्तृत श्रेणी आणि दीर्घकालीन करार आहेत, ज्यामुळे आगामी काळात कंपनीच्या महसुलात वाढ होण्याची मोठी क्षमता आहे. यासाठी 1200 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. Stock Tips
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.techmahindra.com/
हे पण वाचा :
Indian Overseas Bank ने FD वरील व्याजदरात केला बदल, नवीन व्याज दर पहा
FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन दर
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा